खळबळजनक: कोरोना बाधित गरोदर महिला नातेवाईकांसह कोव्हीड सेंटरमधून थेट जिल्हा रुग्णालयात

0

रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत असताना पॉझिटिव्ह रुग्ण आणि नातेवाईक यांचा मनस्ताप देखील आरोग्य यंत्रणेला सहन करावा लागत आहे. गुहागर तालुक्यातील कोरोना बाधित महिलेला उपचारासाठी महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ही महिला शुक्रवारी रात्री नातेवाईकांसोबत कोव्हीड सेंटर असलेल्या महिला रुग्णालयातुन पळून गेली. महिला रुग्णालयातून या महिलेने थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठले. पॉझिटिव्ह महिला थेट सिव्हिल मध्ये आल्याने आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ उडाली. सिव्हिल मध्ये या महिलेची रात्री प्रसूती झाली. यानंतर शनिवारी सकाळी महिलेला आणि नवजात बालकाला पुन्हा महिला रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर विश्वास दाखवावा आणि उपचारासाठी पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. एका चुकीमुळे अनेकजणांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:25 PM 03-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here