आनंद महिंद्रांबाबतच्या वक्तव्यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना सुनावले

0

मुंबई : शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. येत्या १ ते २ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्याचे देखील सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मात्र, पण मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांच्या एका ट्वीटवरून त्यांचे नाव न घेता सुनावले. यावरून अजूनपर्यंत खुद्द आनंद महिंद्रा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली, तरी त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्यमंत्र्यांवर आगपाखड करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच, महाराष्ट्रात लॉकडाऊन लावणे कसे चुकीचे ठरू शकते, याविषयी देखील त्यांनी मत मांडले. तसेच, उद्योगपतींच्या सल्ल्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की आरोग्य सुविधा उभारण्याचे सल्ले दिले, आम्ही त्यावर काम करतच आहोत. पण रोज ५० किमान डॉक्टर, आरोग्य सेवकांची सोय व्हावी. पण, कोरोनाकाळात असे आरोग्यसेवक स्वत:हून सरकारला मदत करण्यासाठी आले होते. पण करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सरकारने त्या लोकांना कामावरून काढून टाकल्यामुळे पुन्हा ते कामावर आले, तर सरकार त्यांना काढून टाकणार नाही, याची काय खात्री आहे? लोकांच्या मनातील तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्यसेवक मिळत नसल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:01 PM 03-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here