घरासमोर फटाके फोडल्‍याने तरूणाचा चाकूने भोसकून खून

0

इचलकंजी : प्रतिनिधी 

घरासमोर फटाके फोडल्याच्या कारणातून एकाच कुटुंबातील तिघांनी युवकाचा चाकूने भोकसून अमानूष खून केला. खून झालेल्‍या युवकाचे नाव राहुल तुलसीदास शिवूडकर (वय 24 रा. यड्राव) असे आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अविनाश नेर्लेकर, सचिन नेर्लेकर व चंद्रकांत नेर्लेकर अशा तिघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. यड्राव परिसरात आठ दिवसाच्या फरकाने दुसरा खून झाल्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, दसरा सणावेळी मंडळाची साऊंड सिस्टिम कोण वापरायची यावरून संशयित व राहुल यांच्यात वाद झाला होता. हा वाद तेव्हापासून धुमसत होता. काल गुरुवारी संकष्टी निमित्त सार्वजनिक आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर फटाके फोडण्यात आले. हे फटाके नेर्लेकर यांच्या घरासमोर फोडल्याने वाद उफाळून आला. यावेळी अविनाश नेर्लेकर याने राहुलच्या मानेवर वर्मी वार केला. यात राहुल जागीच कोसळला. त्यानंतर चंद्रकांत याने तोच चाकू घेऊन अविनाशच्या अविनाशच्या छातीत खुपसला. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन निपचित पडला. त्याला इस्पितळात नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. 

संशयित हल्लेखोर अल्पवयीन असून, तो अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर त्याला सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. त्‍याचे वडील मात्र पसार झाले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here