दुसऱ्यांदा महाड शहरामध्ये पाणी शिरले

0

महाड : गेल्या चोवीस तासात महाड, पोलादपूरमध्ये मुसळधार पाउस झाला आहे. या पावसामुळे सावित्री नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली असून, शहरात भल्या पहाटे पुराचे पाणी शिरले. त्‍या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या मोसमातील दुसऱ्यांदा महाड शहरामध्ये पाणी शिरले आहे. मुख्य बाजारपेठेमध्ये तसेच दस्‍तुरी नाका परिसर जलमय झाला असून, वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्‍यान मुबई – गोवा महामार्गावर पहाटे ३ वाजता पडलेली दरड दूर करण्यात आली असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. मागील २४ तासात 198 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून, आजपर्यंत 1698 मिलिमीटर पावसाची नोद करण्यात आली आहे.

HTML tutorial

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here