‘अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही’: जयश्री पाटील

0

मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे सीबीआयला आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सदर आदेश दिले आहेत. यानंतर, अनिल देशमुख ही मोघलाई नाही. कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया जयश्री पाटली यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआय विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here