हायकोर्टाच्या निर्णयावर परमबीर सिंग यांची चार शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

0

मुंबई : राज्यात सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आज या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हायकोर्टाच्या या आदेशांनंतर परमबीर सिंग यांची प्रतिक्रिया समोर आली आहे मुंबई हायकोर्टाने १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वांचे लक्ष हे परमबीर सिंग यांच्या प्रतिक्रियेकडे लागले होते. मात्र परमबीर सिंग यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देणे टाळले आहे. आय हॅव नो कमेंट्स, एवढ्या चार शब्दातच परमबीर सिंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here