शिवसेना नेते अनंत गिते यांचा खळबळजनक दावा; म्हणतात…

0

रत्नागिरी | राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षात घेण्याची अनेकदा विनंती केली होती. इतकंच नाही तर एकवेळ मला पक्षात नाही घेतलं तरी चालेल,पण माझी मुलगी अदितीला पक्षात घेऊन उमेदवारी द्या, अशी विनंती सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, असा दावा शिवसेना नेते अनंत गिते यांनी केला. गुहागरमधील कोतळूक येथील प्रचार सभेच्या दरम्यान अनंत गिते यांनी हा दावा केल्याने, गुहागरमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे हे यापूर्वीही राष्ट्रवादी सोडण्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी तटकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देत ही अफवा आणि खोडसाळपणाचं वृत्त असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आपण राष्ट्रवादीतच राहून, शरद पवारांवर आपली निष्ठा असल्याचं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं होतं.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here