नवी दिल्ली | सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांनी सरन्यायाधीश पदासाठी मराठी असलेले वरिष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केले आहे. त्यामुळे एका मराठी माणसाची सरन्यायाधिशपदी नियुक्ती होणार आहे. गोगोई यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाला पत्र लिहून ही शिफारस केली आहे. रंजन गोगोई यांनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा सेवाकाळ 17 नोव्हेंबरला संपणार आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा जन्म नागपूरमध्ये 24 एप्रिल 1956 रोजी झाला होता. 1978 साली ते बार काऊन्सिलचे सदस्य बनले. मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यामूर्ती म्हणून त्यांची 2000 साली निवड झाली. काही काळ ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायाधीश राहिले. 2013 साली ते सर्वोच्च न्यायालाचे न्यायाधीश झाले. न्या. बोबडे 23 एप्रिल 2021 साली निवृत्त होतील.
