‘भाकर’ संस्थेने दहा वर्षांत वाचवले पावणेदोनशे संसार

0

रत्नागिरी : रत्नागिरी येथील भाकर संस्थेने गेल्या दहा वर्षांत १ हजार ७५० कुटुंबांचे संसार पुन्हा जोडले आहेत. अनेक वेळा पीडित महिलांना योग्य मदत आणि मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे तिला अन्याय सहन करावा लागतो. न्यायापासून वंचित राहावे लागते. अशा महिलांना सर्व प्रकारची मदत मोफत उपलब्ध व्हावी म्हणून महिला आणि बालविकास विभागाच्या मदतीने महिला आणि मुलांसाठी भाकर सेवा संस्थेने सहाय्यता कक्ष सुरू केला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामार्फत ही संस्था २०१० सालापासून आपले काम करत आहे. या दहा वर्षात एक हजार ७५० महिलांना त्यांचा संसार वाचवण्याकरिता संस्थेने मदत केली आहे. या काळात संस्थेने महिलांकरिता जनजागृतीचे ६५ कार्यक्रम घेतले. संस्थेतर्फे मिळणारी सेवा पूर्णपणे मोफत दिली जाते. महिला सहाय्यता कक्षात समाजकार्याची पदवी घेतलेले दोन समुपदेशक कार्यरत असतात. कोरोनाच्या काळातदेखील हे केंद्र चालू ठेवून केंद्राचे समुपदेशक पवनकुमार मोरे आणि अश्विनी मोरे यांनी महिलांकरिता सर्व प्रकारच्या सेवा पुरविल्या. शासनाच्या आदेशाप्रमाणे परजिल्ह्यातील कामगार आणि मजुरांकडे जाऊन त्यांना समुपदेशन करण्याचे मोलाचे कामही संस्थेने केले. कोरोनाच्या काळात संस्थेने दीडशे कुटुंबांना पुरेसे अन्नधान्य व तेवढ्याच कुटुंबांना हायजीन किटचे वाटप केले. संस्थेने महिला आणि बालविकास विभागाच्या मान्यतेने सखी वन स्टॉप सेंटर गेल्या फेब्रुवारीत सुरू केले आहे. महिलांवर होणारे अन्याय आणि त्यांना आवश्यक असणार्याख सेवा यांकरिता पीडित महिलेला एका छताखाली समुपदेशन, पोलीस, वकील, वैद्यकीय सेवा आणि तात्पुरती सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पाची माहिती गावोगावी महिलांपर्यंत पोहोचावी, याकरिता सखीच्या सर्व कर्मचार्यां्नी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ‘सखी’ वन स्टॉप सेंटरच्या बीना खातू, अंकिता चौघुले, लीना बोरीकर, प्राची रसाळ, मोहन पाटील, अॉड. नंदा चौगुले, डॉ. शीतल भोळे, डॉ. भाग्यश्री तानगे आणि पूर्ण टीम आपत्कालीन परिस्थितीतही २४ तास पीडित महिलेला मदत करण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे. संस्थेविषयी अधिक माहितीसाठी 9970381195 किंवा 7507795321 या मोबाइलवर किंवा bhakar93@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here