भाजपच्या मदतीने रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच यशस्वी – दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी जिल्हा भाजपच्या सक्रिय मदतीने महायुतीचे पाचही उमेदवार विजयी होतील. त्यामध्ये भाजपचे मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅ ड. दीपक पटवर्धन यांनी केले.

HTML tutorial

विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळतील. तेच ध्येय नजरेसमोर ठेवून रत्नागिरी भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी भाजपचे योगदान आहे, असे पटवर्धन म्हणाले.

भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण, कोकण प्रभारी तथा आमदार प्रसाद लाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे या सर्वांनी रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना सर्व योगदानाचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात भाजपच्या मतप्रवाहाचा मोठा मतदार आहे. त्या सर्वांचे पाचही विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना विजयासाठी योगदान असेल, असा विश्वासही जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला.

दापोली मतदारसंघात भाजपचे मतदार महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांना आपले समर्थन देऊन विजयी करतील. महायुतीच्या धर्माशी प्रतारणा होणार नाही. योगेश कदम चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांची भेट घेतल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला आणि भविष्यात भाजप-सेनेचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. उचित सर्व सहकार्य नवीन आमदार करतील, असा विश्वातस बैठकीत मिळाल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.

सर्व मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महायुतीच्या प्रचारातही ते सहभाग घेत आहेत. एकमेकांशी समन्वय राखून प्रचार सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असे पटवर्धन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here