रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची रिपरीप

0

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरीप सुरू झाली आहे. मोसमी पावसाचा हंगाम संपल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असले, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस अजून संपलेला नाही.

आज सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६ मिलिमीटर पाऊस पडला. खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात प्रामुख्याने पावसाची नोंद झाली. देवरूख आणि परिसरात गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. आज जिल्ह्यात सकाळपासूनच आकाश ढगाळलेले होते. दुपारी सर्वत्र किरकोळ सरी पडत होत्या. रत्नागिरीसह अनेक ठिकाणी सायंकाळी पावसाने रिपरीप सुरू केली आहे. हलक्या मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविली असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here