एन. व्ही. रमणा २४ एप्रिलला घेणार सरन्यायाधीश म्हणून शपथ

0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रमणा २४ एप्रिल रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी अलीकडेच न्या. रमणा यांच्या नावाची शिफारस करून होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. यानंतर केंद्राकडे न्या. रमणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. रमणा यांच्या नियुक्ती पत्रावर मंगळवारी स्वाक्षरी केली. आता यानंतर २४ एप्रिल २०२१ रोजी न्या. रमणा सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊन या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. न्या. रमणा हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश असतील.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
1:40 PM 06-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here