वोटर स्लीप ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही

0

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतदारांना वोटर स्लीप वाटण्यासाठी नेमण्यात आलेल्या बीएलओकडुन वाटप करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी जाताना निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या या वोटर स्लीप या मतदान करताना ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार नसल्याने निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक विभागाकडून ओळकपत्र म्हणून विविध स्वरूपाची ११ कागदपत्रे ग्राहय धरण्यात येणार आहेत.

बीएलओंकडून मतदराचे छायाचित्र असलेल्या मतदान वोटर स्लीप वितरित करण्यात आल्या असून त्या केवळ मतदार यादीतील अनुक्रमांक पाहण्यासाठी वापरत येणार आहेत.

मतदान करताना  आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ज्यावर साक्षांकित केलेले छायाचित्र आहे असे बँक पासबुक, पासपोर्ट, केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी असल्यास ते ओळखपत्र, महात्मा गांधी रोजगार योजनेवरील जॉब कार्ड, फोटो असलेले पेन्शन कागदपत्रे, आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले हेल्थ कार्ड, खासदार आमदार, एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) या जनगणना आयुक्त कार्यालयाकडून (आरजीआय) देण्यात आलेले ओळकपत्र, विधान परिषद सदस्य यांना दिलेले यांना ओळखपत्र अशी एकुण अकरा प्रकारामधील कोणतेही एक ओळखपत्र मंतदारांसाठी मतदान करताना मतदान केंद्रावर चालू शकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here