रत्नागिरी तालुक्याचे सुपुत्र असलेले भारतीय सैन्य दालातील जवान भालचंद्र रामचंद्र झोरे (वय-५३) यांचे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास उत्तरप्रदेश येथील अहलाबाद येथे ड्युटीवर असताना ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे मुळगाव रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी अहिल्यानगर होते. त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शनिवारी त्याचा मृतदेह त्यांच्या मुळगावी आणण्यात येणार आहे.
भालचंद्र झोरे यांचा जन्म रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी अहिल्यानगर येथे झाला. त्यांची शालेय जीवनापासून सैन्यात जाण्याची प्रबळ इच्छा होती. त्यामुळे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते सैन्य दालात दाखल झाले. पहिला पंधरा वर्षात त्यांनी देशाच्या सीमेसह इतर भागात सेवा बजावली होती. पहिल्यांदा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ते उत्तरप्रदेश येथील अलाहाबाद येथे कर्तव्यावर होते. दोन महिन्यांनी त्यांची दुसरी टर्म संपणार होती. निवृत्तीनंतर आपल्या गावी परतणार होते. मात्र शुक्रवारी अचानक त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. भालचंद्र झोरे यांच्या निधनाचे वृत्त हरचेरी गावातील अहिल्यानगरात पोहचताच गावावर शोककळा पसरली. गेली अनेक वर्ष सैन्य दलात आपल्या गावातील जवान असल्याचा अभिमान सर्वच गावकर्यांना होता. भालचंद्र झोरे आणि त्यांचे कुटुंब सध्या पुणे येथे स्थायिक झाले होते. मात्र सणानिमित्त ते आपल्या गावी आवर्जून येत असत. गावातील सर्वांचे त्यांच्याशी आपूलकीचे संबध होते. शनिवारी रात्री त्यांचा मृतदेह उत्तरप्रदेश येथे पोहचला होता. शनिवारी सकाळी मुंबई येथे मृतदेह आल्यानंतर तो अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे.
