मुंबई : अभिनेता सलमान खान यांचा निष्ठावंत आणि विश्वासू गुरमीत सिंग उर्फ शेराने शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शेराने शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. शिवसेनाने आपल्या ऑफिशल ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून शेरा शिवबंधनात अडकल्याचे जाहीर केले आहे.
