कोकणातील औद्योगिक क्षेत्रातून वाहणार्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी 13 कोटी 33 लाखांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नगिरी या जिल्ह्यांतील आठ प्रमुख नद्यांचा समावेश आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला नद्यांच्या परिघातील कारखाने आणि अवलंबित असलेल्या गावांच्या सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी आणि अन्य रासायनिक कचरा नद्यांमध्ये सोडण्यात आल्याने कोकणातील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामळे प्रामुख्याने पावसाळ्यात या नद्यांचे पाणी प्रदूषित होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच रासायनिक सांडपाण्यामुळे या नद्यांतील जलचरांनाही धोका संभवत आहे. तसा अहवाल येथील पर्यावरणस्नेही मंडळांनी दिल्याने कोकणातील नद्यांची स्वच्छता करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्ठी आणि गडनदीचा समावेश आहे. नद्यांच्या परिघात अनेक औद्योगीक कारखाने असल्याने कोकणातील प्रमुख नद्यांच्या सिंचनाखाली असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची आरोग्यदृष्ट्या समस्या निर्माण होते. त्यामुळे नदी स्वच्छता आऱाखड्यात कोकणातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी 13 कोटी 33 लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रदुषण नियंत्रण मंडळाला या नद्यांच्या परिघातील गावे आणि कारखान्यांचा सर्वे करण्याच्या सूचना प्रशासनांनी केल्या आहेत.
