लग्नाच्या 20 व्या वाढदिवशी माधुरी दीक्षितचा KISSING सेल्फी व्हायरल!

0

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची लोकप्रियता आजही तेवढीच असलेली पाहायला मिळते. आजही सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. माधुरी सुद्धा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिनं नुकताच तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान माधुरीनं लग्नाच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

HTML tutorial

माधुरी दीक्षितनं करवाचौथच्या दिवशी पती राम नेने यांच्यासोबत एक रोमँटिक सेल्फी शेअर केला. माधुरी आणि तिच्या पतीचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये माधुरी राम यांना किस करताना दिसत आहे.

हा फोटो शेअर करताना माधुरीनं एक पोस्ट सुद्धा लिहिली आणि या पोस्टमध्ये तिनं लग्नाच्या 20व्या वाढदिवसाला पती रामसाठी खास मेसेज सुद्धा लिहिला. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करताना माधुरीनं लिहिलं, ‘जन्मोजन्मीचे सोबती. लग्नाचा 20 वा वाढदिवस’ माधुरी आणि राम नेने एकमेकांसोबत खूप खूश दिसत आहेत. राम हे व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्यामुळे ते नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here