…म्हणून अमृता फडणवीस यांना आता चक्क आपलं वय जास्त असावं असं वाटतंय

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय आहेत. त्यानंतर आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना चक्क आपलं वय जास्त असावं असं वाटतं आहे. “मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे” असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीकरणाबाबत त्यांनी हे ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच COVID19, COVIDvaccine, COVIDSecondWave हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून वेगाने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारनं देशात 45 वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:53 PM 07-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here