इंदापूर : राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेला पवारांचं आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला, मोदी शहाचा बाप आला, अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
शरद पवार यांच्या भाषणाअगोदर सुप्रिया सुळे भाषणाला उभ्या राहिल्या. महाराष्ट्रात एक नवी घोषणा सध्या सुरू झालीये, असं त्या म्हणताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कोण आला रे कोण आला, मोदी शहाचा बाप आला, अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यावर शरद पवार माझादेखील बाप आहे, असं सुप्रिया म्हणाल्या.
शरद पवार यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली. हर्षवर्धन पाटील यांचे काका शंकरराव पाटील स्वर्गात काय म्हणत असतील यांना… ज्या शंकरराव पाटलांनी काँग्रेसचा विचार कधी सोडला नाही त्यांच्या पुतण्याने विरोधी विचाराचा झेंडा हाती घेतला, अशा शब्दात त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली.
दरम्यान, इंदापुरात भाजपच्या हर्षवर्धन पाटील विरूद्ध राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांच्यात लढत होत आहे. महाराष्ट्रातल्या रोमहर्षक लढतींपैकी एक इंदापुरातली लढत गणली जात आहे.
