सनदशीर मार्गाने निषेध करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाची दडपशाही

0

🔳 व्यापाऱ्यांची निषेधाची होर्डिंग्ज नगरपालिकेने काढली; व्यापारी संतापले

रत्नागिरी : सर्वसामान्य व्यापारी आज रोजीरोटीसाठी झटत असताना आता प्रशासनाकडून मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शासनाच्या लॉक डाऊनच्या नियमांना विरोध करीत व्यापाऱ्यानी आपली बाजू प्रशासनाकडे मांडली. शासनाचे नियम आठ दिवस काटेकोरपणे पाळा आपल्याला नक्कीच यातून काहीतरी दिलासादायक मार्ग काढता येईल असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले होते. याप्रमाणे सहकार्य करत व्यापारी महासंघाने आपली भूमिका घेतली. कोणत्याही नियमाचे उल्लंघन न करता सनदशीर मार्गाने आपला विरोध प्रकट केला. शहरात दोन ठिकाणी विरोधाची होर्डिंग्ज लावण्यात आली. मात्र सनदशीर पद्धतीने व सहकार्याची भूमिका बजावणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात नगरपालिका प्रशासनाने दडपशाही चा मार्ग अवलंबला असून व्यापाऱ्यानी लावलेले निषेधाचे होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहे. यामुळे व्यापारी वर्ग कमालीचा संतापला आहे. आपण लोकशाहीत जगत आहोत की इंग्रजांच्या काळात हा प्रश्न व्यापारी विचारू लागले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:13 PM 07-Apr-2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here