रत्नागिरी | विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्ह्यातील 1250 पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मदतीला राज्यातील इतर 600 पोलीस कर्मचारी आहेत. तसेच 1300 होमगार्ड आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या पाच तुकड्या तैनात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली होती. त्याचप्रमाणे ही विधानसभा निवडणूक देखील जिल्ह्यात शांततेत पार पडेल असा विश्वास डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला. एकुण 1703 मतदान केंद्र असणार आहेत. मतदान प्रकियेसाठी 8524 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेत. जिल्ह्यातील 13 लाख 10 हजार 555 मतदार आहेत.
