”महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय लागेल? तज्ज्ञांनी सांगावं”

0

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापनेपासून लोकं अचंबित होत आहे, हे कसं घडलं? सचिन वाझेने NIA ने पत्र लिहिलं, हे वाझे महाविकास आघाडी सरकारला किती प्रिय आहेत ते विधानसभा अधिवेशनावेळी दिसलं. वाझे प्रकरणात विधानसभा ९ वेळा स्थगित करण्यात आली. शरद पवारांनीही अनिल परब गृहखात्यात लुडबूड करत असल्याचं नापसंत केली होती अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. गृहमंत्र्यांनी घोषणा करण्याऐवजी अनिल परब यांनी वाझेंचा चार्ज काढून घेत असल्याचं सभागृहात घोषित केलं होतं असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हंटलं, येत्या १५ दिवसांत आणखी २-३ मंत्र्याचे राजीनामा होणार हा सामान्यांचा अंदाज आहे. वाट पाहून आणखी कोणी कोर्टात जाईल. क्रिकेटच्या मॅचमध्ये पहिले दोन बॅट्समन आऊट व्हायला वेळ लागतो. अनिल परबांचा त्रागा आहे. चौकशीला सामोरे जाणार असेल तर शपथा कसल्या घेताय? निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला आणि सुप्रीम कोर्टात चौकशी होऊ नये म्हणून गेले. सर्वसामान्य माणूस सरकारच्या या प्रकाराला वैतागला आहे. राठोड झाले, देशमुख झाले आणि परबांचे नाव आले आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे. या संघटीत गुन्ह्याचे पुरावे कागदपत्रात आले तर या सर्वांवर मोक्का लावावा असं त्यांनी सांगितले. तसेच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही. परंतु महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी काय राहिलंय. कोरोनात भ्रष्टाचार करणार. हप्ते वसुली करणार आणि केंद्राकडे बोट दाखवणार. केंद्राने काय काय दिलं हे उघड आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय काय लागतं? याबाबत तज्ज्ञांनी सांगावं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 08-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here