”अनिल परबांच्या राजीनाम्यासाठीदेखील न्यायालयाच्या आदेशाची वाट बघावी लागेल का?”

0

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनीच आणखी एका पत्रातून स्फोट केलाय. सचिन वाझेनी मीडियाला 3 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा गंभीर आरोप त्यानी केला आहे. त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सचिन वाझेनी आपल्या पत्रात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेतले आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे. त्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले असून चंद्रकात पाटील यांनी ट्विट करुन अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, आता राजीनाम्यासाठी कोर्टाच्या आदेशाची वाट पहायची का? असा टोलाही त्यांनी लगावला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 08-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here