वडिलांवर अंत्यसंस्कार करून मुलांनी गाठलं मतदान केंद्र!

0

मुंबई | निवडणुक आयोगाने जनतेला वारंवार मतदान करण्याचं आवाहन करूनही राज्यातील मतदानाची सरासरी कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतू बदलापूरमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलांनी मतदान करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

बदलापूरमधील वडवली गावातील पांगळू झिपरु म्हात्रे यांचं रविवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सात मुलांनी त्यांनी अग्नी दिला. सकाळी अस्थी गोळा करण्याचा विधी उरकल्यानंतर सातही मुलं मतदान केंद्रावर पोहोचली आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हात्रे कुटुंबातील एकूण 52 सदस्यांनी यावेळी मतदान केलं.

कुटुंबातील एखाद्या सदस्याचं निधन झाल्यानंतर घरात दुखवटा पाळला जातो. पण म्हात्रे कुटुंबाने मतदान केंद्र गाठत कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, राज्यात 59 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी अधिक मतदान केल्याची माहिती कळतीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here