चिपळूण: पुराच्या पाण्यातून गटारात मगर आली

0

चिपळूण : कोकणसह मुंबई, पुणे परिसरात पाऊस उघडीप घेण्याचे काही नाव घेईना असे झाले आहे. गेल्या २४ तासांपासून संततधार सुरू असलेल्या या पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावाचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूणात धक्कादायक घटना समोर आली. चक्क पुराच्या पाण्यातून गटारात मगर आल्याने एकच खळबळ उडाली. चिपळूणमधील दादर मोहल्ला परिसरात पुराचे पाणी आले आहे. या पाण्यातून मगर आल्याचे काही नागरिकांच्या निर्दशनास आले. ही माहिती सर्वत्र पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. या मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. नागरिकांनी वनखात्याला दादर मोहल्ला परिसरात मगर आल्याची माहिती दिली. याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ह्या मगरीला पिंजऱ्यात जेरबंद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here