महाराष्ट्रात ‘विकेंड लॉकडाऊन’ लागू; विकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; जाणून घ्या, काय सुरू आणि काय बंद?

0

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतच्या गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

HTML tutorial

🔳 आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्टला परवानगी
राज्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल त्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या. तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे.

🔳 जाणून घ्या, वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार?

▪️ कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते 10 आणि 11 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरू राहणार आहे.

▪️ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.

▪️ कोरोना नियमांचं पालन करत एपीएमसी मार्केट सुरू राहणार. मात्र जर स्थानिक प्रशासनाला वाटलं की नियमांचं उल्लंघन होत आहे तर ते राज्य सरकारकडून परवानगी घेऊन मार्केट बंद करू शकतात.

▪️ बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकानं बंद राहतील.

▪️ गॅरेज सुरू राहतील.

▪️ ढाबे सुरू असतील मात्र तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.

▪️ 4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार नागरीक दारू होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करू शकतात. मात्र निश्चित करण्यात आलेल्या वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल.

▪️इलेक्ट्रिक उपकरणाचीदुकानं बंद असतील.

▪️ सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील.

▪️ रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरू असतील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here