तुझ्यात जीव रंगला, महाएपिसोड : राणा-अंजली घेणार महत्वाचा निर्णय

0

मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला आवडते कलाकार भेटायला येणार आहेत. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार भेटीला येणार आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 27 ऑक्टोबर रोजी महाएपिसोड दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत आता नंदिताचा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. आबा आणि राणा यांची नंदिताच्या तावडीतून सुटका झाली आहे. नंदिताला तिच्या चुकीची शिक्षा मिळणार असून पुढे काय होणार हे या महाएपिसोडमध्ये दाखवण्यात आली आहे. महाएपिसोड सायंकाळी 8 ते 9 या वेळेत दाखवण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

काय असणार महाएपिसोडमध्ये?

महाएपिसोडमध्ये हा पाच सहा वर्षाच्या काळात काय काय घडलं याची थोडक्यात माहिती दिली जाते आणि पुढील गोष्ट सुरु होते. या पाच सहा वर्षाच्या काळात हे सगळं केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी झालं, त्यामुळे अशी संपत्ती नकोच असा विचार करुन राणाने संपत्तीवरचा मालकी हक्क सोडला. आता त्याने काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करायचं ठरवलं. अंजलीनेही त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला. राणाने आता अभ्यास करण्याचं मनावर घेतलं.

दोनवेळा नापास झाल्यानंतर राणा 12 वी पास होतो. दरम्यान आबा सर्वांना सोडून जातात. पण मरताना राणाकडून शब्द घेतात की तू घरावरचा हक्क सोडला असलास तरी मोठ्या भावाचं कर्तव्य विसरु नको. सगळ्यांना सांभाळून घे. घर आधीसारखं सांभाळ. आबा गेल्याच्या धक्क्यातून सावरलेला राणा नोकरीचा शोध करताना त्याला स्पोर्ट्स कोट्यातून पोलिस भरतीची माहिती कळते. राणा भरती होऊन ट्रेनिंग घेतो. याच दरम्यान राणा अंजलीला मुलगी होते. अंजली आणि राणा जितके शांत स्वभावाचे आहेत तितकीच ही मुलगी तिखट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here