शहीद जवान झोरेंच्या आईने समाजापुढे ठेवला आदर्श

0

रत्नागिरी : हरचेरी गावाचे सुपुत्र सुभेदार भालचंद्र झोरे यांचे देशाच्या सीमेवर सेवा बजावत असताना हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले. शहीद भालचंद्र झोरे यांच्या कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांच्या मातेने अंत्यविधीच्या दुसर्याच दिवशी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडीत साम्जासमोर एक आदर्श ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून अनेकजण एन्जॉय करतात. लोकशाहीतील सर्वात महत्वाचे कर्तव्य पार पडण्याचा देखील अनेक सुशिक्षितांना विसर पडतो. मात्र सिताबाई रामचंद्र झोरे, वय ७५वर्षे यांनी आपल्या मुलाच्या अंत्यविधी नंतर दुसऱ्याच दिवशी मतदान करून एक आदर्श समजापुढे ठेवला आहे.

HTML tutorial

२० ऑक्टोबर ला सुभेदार भालचंद्र झोरे यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला पंचक्रोशीत बहुसंख्य जनता तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व विद्यमान आमदार उदयजी सामंत हे देखील उपस्थीत होते. याच्या दुसर्याच दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होते. सर्वाना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यसाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न देखील करत असते मात्र अनेकजण ते करताना दिसत नाहीत. मात्र या शहीद जवानाच्या आईने आपल्या मुलाच्या अंत्यविधीच्या दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदान करून एक आदर्श निर्माण केला आहे. अहिल्यानगर येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ श्री. बावाशेठ झोरे, पोलीस पाटील संतोष भोजे यांनी या मातेला मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here