एटीएम कार्ड अदलाबदली करुन लोकांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

0

रत्नागिरी जिल्हयामध्ये एटीएम अदलाबदली करुन स्थानिक नागरीकांची फसवणुक केलेबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १६६ / २०१९ भादवि कलम ४२० व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १६२ / २०१९ भादवि कलम ४०३ असे गुन्हे दाखल होते . सदर गुन्हयाचे तपासकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . शिरीष सासने यांनी एक पथक तयार करुन त्यांनी त्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना व मार्गदर्शन केलेले होते . त्याप्रमाणे सदर पथकाने गुन्हे घडलेल्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केलेले होते . तसेच महाराष्ट्रामध्ये असे गुन्हे करणाऱ्या टोळयांची माहीती प्राप्त करुन घेवून सदर टोळयांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केलेले होते . त्याप्रमाणे सदरची टोळी ही आज रोजी रत्नागिरी शहरामध्ये अशाच प्रकारचे गुन्हे करण्यासाठी येणार असलेबाबत गोपनीय बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर पथकाने हातखंबा येथे संशयास्पद टोळीचा मागोवा घेवून १ ) सागर देविदास अंभोरे वय २५ रा . बाबासाहेब आंबेडकरनगर उल्हासनगर जि . ठाणे २ खेमाणे , हनुमानमंदीरजवळ २ ) महेश पांडुरंग धनगर वय ३१ रा . ब्राम्हणपाड , विठ्ठलमंदीराच्या बाजुला , विठ्ठलवाडी स्टेशन जि . ठाणे ३ ) गणेश बाळचंद्र लोडते वय २१ रा . रमाबाई आंबेडकर नगर , उल्हासनगर , २ आईस फॅक्टरीशेजारी ता . कल्याण जि . ठाणे ४ ) रोहीत ओमशंकर मधुकर शर्मा वय २५ , रा . संत ज्ञानेश्वरनगर , उटी सेक्शन मंदीराजवळ , उल्हासनगर २ कल्याण जि . ठाणे ५ ) विकी राजू वानखेडे वय १९ रा . विठ्ठलवाडी पोलीस चौकीच्या बाजूला , सुमन बिल्डीग , जि . ठाणे यांचेकडे गुन्हयांचे अनुषंगाने चौकशी केली . त्यामध्ये त्यांनी वरील गुन्हे तसेच खेड पोलीस ठाण्याकडील याच प्रकारचे गुन्हे व महाराष्ट्र राज्यातील पुणे , सोलापूर , सांगली , सातारा , मुंबई , ठाणे तसेच गोवा , कनार्टक , आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली देलेली आहे . सदर टोळीकडून २ , ४३ , ४०० रुपये रोख रक्कम , मोबाईल हॅन्डसेट , वेगवेगळया बॅकांची एटीएम कार्ड तसेच गन्हयाचे कामी वापरलेली स्वीफ्ट कार असा एकूण ५ , २३ , २२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे .

नमुद आरोपीत यांना पुढील कार्यवाहीकरीता रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनकडे सुपुर्द करण्यात आलेले आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक डॉ . प्रविण मुंढे , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री . शिरीष सासने , पोउनि श्री . विकास चव्हाण , संदीप कोळंबेकर , सुभाष भागणे , पोना – नितीन डोमणे , विजय आंबेकर , सागर साळवी , दत्ता कांबळे तसेच सपोफौ सुभाष माने , शांताराम झोरे , राजेश भुजबळराव , प्रशांत बोरकर , अरुण चाळके , अमोल भोसले यांनी केलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here