गायक अभिजीत नांदगावकर यांचे पहिले गीत होणार रिलीज

0

21 वर्षांपूर्वी “ताक धिना धिन” विशेषत्वाने समाविष्ट करण्यात आलेले एकमेव गीत

अभिजीतने पुन्हा प्रोफेशनली केले रेकॉर्ड

रत्नागिरी : पुणे स्थित मूळचे रत्नागिरीतील प्रसिद्ध गायक अभिजीत नांदगावकर याचे पहिलं प्रोफेशनल गीत “केव्हा केव्हा वाटते” गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होत आहे. जगभरातील रसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी संगीत क्षेत्रातील नामांकित “स्मृतिगंध” या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हे गाणं रिलीज होईल. या गीताचा गीतकार, संगीतकार आणि गायक अभिजीतच आहे. तब्बल 21 वर्षांपूर्वी हे गीत “ताक धिना धिन” या तत्कालीन लोकप्रिय कार्यक्रमात निर्मात्या नीना राऊत (“लोकमान्य, तान्हाजी” या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या मातोश्री) यांनी आवर्जून समाविष्ट केले होते. गायक अभिजीत याने 21 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आता साकार होत आहे. इतक्या वर्षांनंतर अभिजीत नांदगावकर याने या गीताचे प्रोफेशनली रेकॉर्डिंग केले आहे.

या गीताबाबत अभिजीतने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझा पहिलावहिला व्हिडिओ अल्बम रसिकांच्या भेटीला येतोय, याची मला खूप उत्सुकता आहे. गाणं खूप सुंदर झाले आहे. आजच्या युवा पिढीसह सर्वांना हे गाणं आवडेल. विशेष बाब म्हणजे गीताचे व्हिडिओ मेकिंग दिवंगत प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या पुण्यातील अद्ययावत “डॉन (Down)” रेकॉर्डिंग स्टुडिओत झाले आहे. ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.

या गीताचे संगीत संयोजन समन्वयक म्हणून प्रसिद्ध संगीतकार मयुरेश माडगावकर यांनी काम पाहिले आहे, तर प्रसिद्ध गायक केवल वाळंज याने गीताचे रेकॉर्डिंग, मिक्सिंग व मास्टरिंग केले आहे. सांताक्रूझ-मुंबई येथील डिएम स्टुडिओत या गीताचे रेकॉर्डिंग झाले आहे. तर पुण्यातील डी सेव्हन फिल्म्स अँड मीडियाचे संचालक, तसेच दिग्दर्शक दिनेश पवार यांनी या गीताच्या व्हिडिओची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री पूनम घाडगे यांच्यावर हे गाणं चित्रित झाले आहे. या दोघांनीही जबाबदारी उत्कृष्ट सांभाळल्याने व्हिडिओ सुंदर झाला आहे. छायाचित्रण- गौरव कुंभार, संकलक शुभम राऊत, मेकअप-हेअर ड्रेसर वृषाली पानसरे, स्नेहल साळुंके, वेशभूषाकार माधुरी पवार, प्रोडक्शन मॅनेजर यश शाह, समाधान बागुल या सर्वांनी आपले काम उत्तम केले आहे.

अभिजीतला भाऊ गुरुदेव नांदगावकर, मित्र संजीव कबीर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच यश गोखले, चिराग गुजराते, दुर्वा बागवे, सतीश मेस्त्री, राज मेस्त्री, सौरभ मलूष्टे, अभिजीत हेगशेट्ये, प्रवीण पावसकर, प्रणित मेस्त्री, कैलास सोनवणे, योगेश सोनवणे, रितू सोनवणे, हर्षदा सोनवणे यांचेही बहुमोल सहकार्य लाभले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:19 PM 11-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here