शृंगारतळी येथील सुप्रसिद्ध मालाणी मार्ट मध्ये चोरी

0

गुहागर : ऐन दिवाळीच्या सणात शृंगारतळी येथील मालाणी मार्ट मध्ये चोरी झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे . याप्रकरणी  तपास सुरू असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येते.गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या  शुंगारतळी मध्ये महत्त्वपूर्ण अशी बाजारपेठ आहे. या शुंगारतळीत नेहमीच सणासुदीला बाजारपेठेत खूप गर्दी असते त्यामुळे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानात सामान भरत असतो याचाच फायदा घेऊन दिवाळीच्या आदल्या दिवशी शृंगारतळी येथील प्रसिद्ध व्यापारी नासिम मालाणी यांच्या मालाणी मार्ट मध्ये मागच्या दराने प्रवेश करत चोरी केली . त्यामध्ये जवळपास एक लाख 80 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. ज्यांनी चोरी केली ते चार चोर मालाणी आर्ट मधील सीसीटीव्हीत कैद झालेत. त्यांना बाहेरून 2 जण मोबाईलवर बोलत मदत करत असल्याचे सीसीटीव्ही कैद झाले आहे.या चोरीच्या तपासासाठी रत्नागिरीतून ठसा तज्ञ व स्वान पथक यांना पाचारण करण्यात आले असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत. ऐन दिवाळीत ही चोरी झाल्यांने व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होते. तरी त्वरित पोलिस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here