59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 18 नोव्हेंबर पासून

0

रत्नागिरी । प्रतिनिधी

59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत रत्नागिरी येथे सुरू होणार आहे. दिवसाला दोन याप्रमाणे 12 नाटके यावेळी सादर होणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीमध्ये पहिलं नाटक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 12.30 वाजता सुरू होईल. श्री देवी जुगाई कलामंच कोसुम्ब, संगमेश्वर यांचे ‘तरुण आहे रात्र अजूनही’ हे नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक सुनील जाधव आहेत. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता श्री भैरी देव देवस्थान, जांभारी, रत्नागिरी या संस्थेचे ‘अचानक’ हे नाटक सादर होणार असून योगेश सोमण हे लेखक आहेत तर प्रशांत पावरी यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. दिनांक 19 नोव्हेंबर रोजी श्री आकेश्वर सेवा मंडळ धामेळेवाडी, कोतवडे, रत्नागिरी या संस्थेचे ‘आता उठवू सारे रान’ हे नाटक सादर केले जाणार आहे. सुनील माळी हे या नाटकाचे लेखक असून त्यांचे दिग्दर्शन आहे. तर सायंकाळी 7 वाजता रत्नागिरीच्या संकल्प कलामंच संस्थेचे ‘नांगर’ हे नाटक सादर होईल. राजेंद्र पोळ यांनी याचे लेखन केले असून गणेश गुळवणी यांनी दिग्दर्शन केले आहे.

20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कला मंच देवरूख या संस्थेचे ‘ती रात्र’ हे नाटक सादर होणार असून हेमंत ऐदलाबादकर हे या नाटकाचे लेखक आहेत तर संजय सावंत यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. याच दिवशी सायंकाळी 7 वाजता समर्थ रंगभूमीचे ‘फेरा’ हे नाटक सादर होणार आहे. लेखक निखिल मोंडकर आहेत तर दिग्दर्शक संतोष सनगरे आहेत. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता राधाकृष्ण कलामंच या संस्थेचे ‘रिमोट कंट्रोल’ हे नाटक सादर केले जाणार आहे. शेखर ढवळीकर लिखित हे नाटक मिलिंद टिकेकर यांनी दिग्दर्शित केले आहे. तर सायंकाळी सात वाजता नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळ, पाली, रत्नागिरी या संस्थेचे ‘एक्सपायरी डेट’ हे नाटक सादर होणार असून चैतन्य सरदेशपांडे लेखक आहेत तर गणेश राऊत दिग्दर्शक आहेत.

दि. 22 नोव्हेंबर रोजी महाकाली रंगविहार, नाणीज, रत्नागिरी या संस्थेचे ‘रेस्टहाऊस’ हे नाटक सादर होणार असून लेखक रमेश कीर आहेत. तर सायंकाळी सात वाजता बसणी पंचक्रोशी ग्रंथालय, रत्नागिरीचे ‘अवघड जागेचं दुखणं’ हे नाटक सादर होईल. याचे लेखक ऋषिकेश कोळी असून दिग्दर्शक ओमकार पाटील आहेत. दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता अजिंक्यतारा थिएटर्स, गणेशगुळे रत्नागिरी यांचे ‘धुवॉ’ हे नाटक सादर होणार असून हे नाटक डॉ. सोमनाथ सोनवलकर यांचे आहे तर दशरथ रांगणेकर यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. या दिवशी सायंकाळी 7 वाजता आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, रत्नागिरी यांचे ‘या व्याकुळ संध्यासमयी’ हे नाटक सादर होईल. लेखक मनोहर लेखक आणि दिग्दर्शक मनोहर सुर्वे आहेत. राज्य नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील हे अंतिम नाटक असेल. वर्षीपासूनच सिँधुदुर्गातील नाटकांचे प्राथमिक फेरीतील प्रयोग सिंधुदुर्ग येथे होतात होत असतात. याहीवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रयोग तेथे होणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here