माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स; बुधवारी होणार चौकशी

0

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. बुधवारी देशमुख यांची सांताक्रूझच्या डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयचे अधिकारी चौकशी करणार आहेत. नुकतेच सीबीआयने देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांची चौकशी केली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचे पथक मुंबईत आले आहे. सध्या हे पथक सांताक्रूझच्या डीआरडीओ येथील गेस्ट हाऊसमध्ये तळ ठोकून आहे. सीबीआयच्या पथकाने या पूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील यांची चौकशी केली होती. तसेच नुकतेच देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकाची 8 तास चौकशी केली होती. त्या चौकशीनंतर आज सीबीआयने देशमुख याना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. बुधवारी सांताक्रूझच्या डीआरडीओ येथील गेस्ट हाऊस येथे देशमुख यांची चौकशी केली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 13-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here