प्रथम भ्रष्ट कारभार सुधारा, नंतर सामंतांची वकिली करा

0

🔳 बंड्या साळवी हे दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणारे अकार्यक्षम नगराध्यक्ष

🔳 माजी आमदार बाळासाहेब माने यांचा नगराध्यक्षांवर पलटवार

रत्नागिरी : भाजपच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेली ६४ कोटींची रत्नागिरी शहर नळपाणी योजना साडेचार वर्षे पूर्ण होऊनही ज्यांना पूर्ण करता आली नाही, ज्यांच्या नगर परिषदेतील भ्रष्टाचाराच्या कथा रोजच चर्चेत असतात, अशा अकार्यक्षम नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी मला शिकवू नये. त्यांनी प्रथम आपला कारभार सुधारावा आणि मगच सामंत यांची वकिली करणारी पत्रके काढावीत. शिवसेनेच्या मतदारांच्या जीवावर कोणी माजोरिपणा करू नये, असा इशारा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील एकमेव रत्नागिरी नगर परिषदेला बाळ माने यांनी माजी आमदार असून सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ६४ कोटी रुपये रत्नागिरी शहर पाणी योजनेकरीता मंजूर करून घेतले, हे बंड्या साळवी विसरले काय? निधी मंजुरीला आज साडेचार वर्षे झाली, तरीही रत्नागिरीकराना त्या योजनेचे पाणी काही प्यायला मिळालेले नसल्याने अकार्यक्षम नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी मला यासंदर्भात शिकवू नये. आधी आपल्या पायाखालची आग पाहावी आणि विझवावी. आपल्या नगर रिषदेतील भ्रष्ट कारभार हा अनेकवेळा प्रसारमाध्यमांनी जनतेसमोर आणलेला आहे. रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार प्रथम सुधारावा. भाष्टाचाराच्या रोज येणाऱ्या बातम्या पाहिल्या तर पारदर्शक कारभार करण्याच्या वचनाचे झाले काय, हा जनतेला प्रश्न पडला आहे. कुठे गेला तुमचा पारदर्शक कारभार, असा सवालही श्री माने यांनी केला आहे. पाण्याच्या टाकी साठी शासन मोफत जमीन देण्यास तयार असताना एका व्यक्तीने वर्षभरापूर्वी १७ लाखाला विकत घेतलेली जमीन सव्वा कोटी रुपयांना विकत घेण्याचा घाट घातला गेला, हा कसला पारदर्शक कारभार आहे, असा सवाल श्री.माने यांनी केला.

त्यामुळे आधी बंड्या साळवी यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपातून बाहेर यावे, पारदर्शक कारभार करून दाखवावा. केवळ दुसतलेयाच्या ओंजळीने किती दिवस पाणी पिणार, हेसुद्धा ठरवावे, असा पलटवार बाळ माने यांनी केला. ते म्हणाले, माजी आमदार असूनसुद्धा रत्नागिरी मतदार संघ आणि जिल्ह्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, गडकरी साहेबांच्या माध्यमातून महामार्ग आणि केंद्राच्या अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत, हे जनतेला चांगले माहिती आहे. तुम्ही गेल्या दीड वर्षाच्या राज्यातील सत्ताकाळात काय विकास केला, किती निधी आणला हे दाखवून द्यावे. त्यामुळे यापुढे आपल्या जबाबदाऱ्या न झटकता दुसऱ्यांवर दोषारोप करू नयेत, असा टोला माने यांनी लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:59 PM 13-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here