कोरोनाकाळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी

0
FILE PHOTO: Medical staff with protective clothing are seen inside a ward specialised in receiving any person who may have been infected with coronavirus, at the Rajiv Ghandhi Government General hospital in Chennai, India, January 29, 2020. REUTERS/P. Ravikumar/File Photo

रत्नागिरी : माणुसकी म्हणून कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसलीही हमी न देता शासनाने सेवेत घेतले आहे. दुर्दैवाने त्यातील कोणाचे काही कमीजास्त झाले तर त्याची जबाबदारी शासनाने घेतलेली नाही. तशी वेळ येऊ नये पण आल्यास सरकारला महागात पडेल. आम्ही संविधानाला अनुसरून सर्व पायऱ्यांवर लढू, असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचचे बाबासाहेब ढोल्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

राज्यभरात करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. इतर साधनसामग्री खरेदीवर अफाट खर्च करणारे शासन या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेची शाश्वती देत नाही. तुटपुंजे वेतन, कामाचे अनिर्बध तास यातून हा कर्मचारीवर्ग मेटाकुटीला आला आहे. भविष्यात कायम नोकरी मिळेल या आशेने राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांविषयी शासनाचे सहानुभूतीचे धोरण नाही. राज्यात अनेक ठिकाणी अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण एकत्र ठेवत असल्याचे ऐकिवात आहे. काही ठिकाणी दहा कर्मचाऱ्यांचे काम एकटा कर्मचारी करीत असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाचे म्हणजे शासनाने पहिल्या फेरीत करोना लागण कमी होताच अनेक कर्मचाऱ्यांना तीन महिने सेवा करून घेऊन कमी केले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी जाहिरात देण्यात आली. मात्र प्रवेश शुल्क भरून परीक्षेतील गोंधळामुळे भरती झाली नाही. शासनाला कोविड काळातील कर्मचाऱ्यांविषयी सहानुभूती नसून गरजेपुरता वापर सुरू आहे. हे निषेधार्ह असून सर्व संवर्गातील या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे. अधिक सेवाकाळात जीवित हानीची जबाबदारी घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्यात भरमसाठ रुग्णवाढ असूनही अजूनही पुरेसा कर्मचारीवर्ग घेण्यात आलेला नाही. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे.हे निवेदन समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, नीलेश आखाडे, रघुनंदन भडेकर, आनंद विलणकर, भाग्यश्री ओझा, वर्षा पाठारे, राधिका जोगळेकर, जान्हवी कुलकर्णी, साधना भावे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:30 PM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here