मुंबई विद्यापीठ घरीच पाठवणार स्थलांतर प्रमाणपत्र

0

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचे स्थलांतर प्रमाणपत्र आता घरबसल्या मिळणार आहे. त्याकरिता ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना घरपोच स्थलांतर प्रमाणपत्र देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर विद्यापीठांत किंवा परदेशी शिक्षणसंस्थेत प्रवेश घेण्याकरिता स्थलांतर प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. हे प्रमाणपत्र २०० रुपये शुल्क आणि २० रुपये अर्ज शुल्क विद्यापीठात भरल्यानंतर काही दिवसांत विद्यार्थ्यांना मिळते. मात्र अनेकदा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये विद्यापीठाकडून चुका होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चुका दुरुस्तीसाठी विद्यापीठामध्ये तीन-चार फेऱ्या माराव्या लागतात. मुंबई विद्यापीठाची भौगोलिक व्याप्ती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांपर्यंत आहे. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईत यावे लागते. यासाठी किमान दोन ते तीन हजार रुपये खर्च होतो. तसेच वेळेचा अपव्यय होऊन त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी युवासेनेने स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याबरोबरच विद्यार्थ्यांना घरपोच स्थलांतर प्रमाणपत्र देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला. आता विद्यार्थ्यांना घरबसल्या स्थलांतर प्रमाणपत्र मिळणे सोपे होणार आहे. विद्यार्थी देशविदेशात असला तरी त्या पत्त्यावर स्थलांतर प्रमाणपत्र विद्यापीठाकडून कुरियरमार्फत पाठवण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here