केरळमधून फूस लावून पळवलेल्या अल्पवयीन मुलीस रत्नागिरी स्थानकावर घेतले ताब्यात

0

रत्नागिरी : एर्नाकुलम-ओखा एक्स्प्रेसमधून केरळ राज्यातील कन्नूर येथून फूस लावून पळवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बल आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. संबंधित मुलीला फूस लावून पळवून नेणारा तरुण सापडलेला नाही. ही कारवाई सोमवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास करण्यात आली. रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक अजित मधाळे यांना रेल्वे सुरक्षा बल मडगाव आणि बेलापूर यांच्याकडून खबर मिळाली होती. त्यानुसार एर्नाकुलम -ओखा एक्सप्रेसमधून एक अल्पवयीन मुलगी व सोबत दोन मुली आणि इतर दोनजण जात आहेत. त्यातील अल्पवयीन मुलगी संदर्भात केरळ येथील कन्नूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत तक्रार देण्यात आलेली आहे. ही माहिती मिळताच मधाळे यांनी ग्रामीण पोलिसांना याची खबर दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि ग्रामीण पोलिसांचे संयुक्त पथक तयार करुन त्यांना तीन भागात विभागले. दरम्यान, दुपारी ३.५० वा.सुमारास एर्नाकुलम-ओखा रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनमध्ये आली. यावेळी डब्याची तपासणी केली तेव्हा पथकाला बंद शौचालयात एक अल्पवयीन मुलगी आढळली. तिला रेल्वेतून उतरवून तिची चौकशी केली असता तिने आपले वय १३ असून वडिलांचे नाव व पत्ता सांगितला. माहिती मिळाल्यानुसार तिला पळवून नेणारा मित्र मात्र सापडलेला नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मुलीला ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, कारवाईची सर्व माहिती कन्नूर पोलिसांना देण्यात आलेली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here