कुडाळ : कुडाळ येथे शिवसेनेच्या आषाढी महोत्सवाला शुक्रवारी दिमाखात प्रारंभ झाला. रविवार 28 जुलैपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित आषाढी महोत्सवाच उद्घाटन शुक्रवारी कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल येथे पार झाला. पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख आ. वैभव नाईक, भाजपाचे युवानेते संदेश पारकर, महिला संपर्क प्रमुख सौ.सुचिता चिंदरकर, तालुका प्रमुख राजन नाईक, गटनेते नागेंद्र परब, जि.प.सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, राजू कविटकर, वर्षा कुडाळकर, पोलिस निरीक्षक शंकर कोरे, महीला आघाडी जिल्हा संघटक सौ.जान्हवी सावंत, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, पं.स.सदस्य जयभारत पालव, माजी तालुका प्रमुख संतोष शिरसाट, माजी जि.प.सदस्य संजय भोगटे, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, गणेश भोगटे, जीवन बांदेकर, सौ.प्रज्ञा राणे, सौ.श्रेया गवंडे, अल्पसंख्य सेलचे तालुकाध्यक्ष अक्रम साठी, दशावतारी कलावंत ओमप्रकाश चव्हाण, दशावतारी नाट्य मंडळाचे अध्यक्ष बाळा सावंत आदींसह शिवसेना-युवासेना पदाधिकारी-कार्यकर्ते व नाट्यरसिक उपस्थित होते. उदघाटनानंतर संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचा ‘मयूर ध्वज सत्वपरीक्षा’ हा नाट्यप्रयोग झाला. सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. महोत्सवांतर्गत शनिवार 27 जुलै रोजी सायं.5 वा. संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचा वत्सला हरण नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. रविवार 28 रोजी खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आषाढी महोत्सवाची सांगता होणार आहे.
