शरद पवार रुग्णालयात पण सुप्रिया सुळेंनी ‘ब्रीच कॅंडी’च्या गेटवरुन पंढरपूरची सभा गाजवली

0

मुंबई : एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात एडमिट आहेत. २ दिवसांपूर्वी त्यांच्यासह शस्त्रक्रिया झाल्याने सध्या ते रुग्णालयात आहेत. तर दुसरीकडे, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली आहे. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या रिक्त जागी त्यांच्या मुलाला म्हणजे भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. १७ एप्रिलला ही निवडणूक होणार असून भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. दरम्यान, आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नेते सभा घेताना दिसत आहेत. वडिलांची तब्येत ठीक नसल्याने पंढरपूरात थेट न जाताही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपूरची सभा गाजवली आहे. आज सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरुनच व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूरच्या मतदारांशी संवाद साधला.

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरुन सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या व्हर्च्युअल सभेत पंढरपूरात येण्यात इच्छा होती, कार्यक्रमही ठरला होता पण शरद पवाराच्या तब्येतीमुळे प्रत्यक्ष जायला न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही पंढरपूरचा चेहरामोहरा बदलायचे ठरवले होते. त्यामुळे भारत भालके आणि पंढरपूरासोबत आमचं एक वेगळं नातं होतं. मात्र, नाना अर्ध्या वाटेवर साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे आता विश्वासाच्या नात्याने ही जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर सोपविली आहे. आता आपण नानांची अधुरी स्वप्नं पूर्ण करु. त्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:17 PM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here