‘सुपरस्प्रेडर’ व्यापाऱ्यांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

0

रत्नागिरी : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेले पहावयास मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी हा सुपरस्प्रेडर म्हणून गणला जातो. तसेच कोरोना संक्रमाणास सुरुवात झाल्यापासून अत्यावश्यक सेवेतील व्यापारी देखील सातत्याने लोकांच्या संपर्कात येत आहेत. हे सर्व लक्षात घेऊन रत्नागिरी व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांचे कोव्हीड लसीकरण प्राधान्याने करावे अशी मागणी केली केली होती. या मागणीला न्याय देत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला या लसीकरणाबाबत सूचना दिल्या होत्या व तातडीने असे शिबीर आयोजित करण्यास सांगितले होते. यानुसार आज दिनांक 15 एप्रिल रोजी जुना माळ नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात 45 वर्षावरील व्यापाऱ्यांसाठी विशेष कोव्हीड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केले असून जास्तीत जास्त व्यापाऱ्यानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
9:30 AM 15-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here