मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी विलंब होत आहे, ही सर्व परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनायचे असल्याने होत आहे असे मत काही भाजपा नेते पडद्यामागे बोलत आहेत. भाजपने निवडणुकीपूर्वी जे ठरवलं होते, ते शिवसेनेला दिले नाही, शिवसेनेची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यात ही अधांतरी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच केला आहे. मात्र दिलेल्या शब्दांवर घुमजाव करत सत्तेत अर्धा वाटा देण्याचे वचन कधीच देण्यात आले नव्हते असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यावर आता बीजेपीमध्ये देखील काही वेगळ्या सूर उमटू लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांना केवळ पुन्हा मुख्यमंत्री बनायचे असल्याने शिवसेना भाजप मध्ये एव्हढी ताणाताणी होत असल्याचे काही बीजेपी नेतेच बोलत आहेत. सत्ता स्थापण्याचा विलंब हा केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या हट्टातून होत असल्याचे मत काही बीजेपी नेते पडद्यामागे व्यक्त करू लागले आहेत. या ठिकाणी जर नितीन गडकरी असते तर सत्ता स्थापन करताना इतक्या अडचणी आल्या नसत्या असे देखील बोलले जात आहे.
