रत्नागिरी नगर परिषदेत कोव्हीड सेंटर कधी सुरू होणार ? : ॲड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : रत्नागिरी मध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. रुग्णांसाठी अधिकची बेड व्यवस्था हवी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ५००० रुग्ण संख्या होण्याची भीती व्यक्त केली. मग एवढी रुग्ण संख्या लक्षात घेता रत्नागिरी मध्ये अधिक हॉस्पिटल्स ऑक्सीजन बेडची आवश्यकता आहे. रत्नागिरी नगरपरिषद कोव्हीड केअर सेंटर सुरू करणार अशी घोषणा झाली मात्र अद्यापपर्यंत ते सुरू झाल्याचे ऐकिवात नाही. रत्नागिरी नगरपरिषदेला शहरवासीयांची काळजी घेण्याच्या दृष्टीने तात्काळ केअर सेंटर सुरू करावे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी इतकी दिरंगाई अपेक्षित नाही. रत्नागिरी नगरपरिषद या जिल्ह्यातील मोठी नगरपरिषद असून अद्याप कोव्हीड हॉस्पिटल सुरु करण्यात मागे आहे हि बाब खेदजनक आहे. नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांनी या संदर्भात तात्काळ कार्यवाही करत कोव्हीड केअर सेंटर सुरू करावे. कोव्हीड निधी यासाठी उपलब्ध आहे अशी माहिती मिळते. कोव्हीडची स्पोटक परिस्थिती रुग्ण संख्या पहाता आता अधिक वेळ न घालवता कोव्हीड सेंटर तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने करावी, अशी मागणी ॲड. दीपक पटवर्धन यांनी मा.नगराध्यक्ष व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 15-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here