व्यापारी महासंघाच्या सुसूत्र नियोजनाखाली जिल्हा आरोग्य विभागाचे कोव्हीड लसीकरण संपन्न

0

🔳 आजच्या विशेष लसीकरण मोहिमेत २५० व्यापाऱ्यांनी घेतली लस

रत्नागिरी : व्यापारी महासंघाच्या सुसूत्र नियोजनात जिल्हा आरोग्य विभागाचे व्यापाऱ्यांसाठीचे विशेष कोव्हीड लसीकरण आज स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे पार पडले. या लसीकरणात २५० व्यापाऱ्यांना लस देण्यात आली. रत्नागिरी व्यापारी महासंघाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे अशा शिबिराची मागणी केली होती. व्यापारी हा सुपरस्प्रेडर या वर्गात मोडतो म्हणून प्राधान्याने त्यांचे लसीकरण करून घ्यावे अशा सूचना ना. सामंतानी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. व्यापारी महासंघाने या शिबिराचे सुसूत्र नियोजन करीत एक आदर्शवत शिबीर पार पाडले. येणाऱ्या लाभार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी बैठक व आराम व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय हॉटेल व्यवसायिक गणेश धुरी यांच्याकडून लाभार्थ्यांना चहा, नाश्ता व भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:44 PM 15/Apr/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here