सरसकट टेस्टिंग करून आकडा का फुगवताय ?

0

🔳 जिल्हा परिषद मधील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांची उद्या होणार टेस्टिंग

रत्नागिरी : दिसेल त्याची कोरोना टेस्ट करण्याचा धडाका जो प्रशासनाने लावला आहे त्याबद्दल नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली आणि यात ३८ जण पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे यातील कुणालाही कुठलीच लक्षणे नव्हती. आता या सर्वांचे विलगीकरण झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात ३८ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. उद्या अशाच पद्धतीने जिल्हा परिषद मधील सुमारे कर्मचाऱ्यांचे टेस्टिंग होणार आहे. आधीच हॉस्पिटल हाऊसफुल्ल झालेली असताना आता या तपासणीत पॉझिटिव्ह आढळेलेल्या लोकांची विलगीकरणाची व्यवस्था कुठे करणार ? असा प्रश्न कर्मचारी विचारू लागले आहेत. फक्त लक्षणे असणाऱ्या नागरिकांचीच टेस्ट करा असा निर्णय मागील वेळी शासनाने घेतला होता. मग आता सरसकट टेस्टिंग का ? कोरोना रुग्णांचा आकडा फुगवण्यासाठी हे षडयंत्र तर नाही ना ? असा प्रश्न जनतेच्या मनात आता निर्माण झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
09:26 PM 15/Apr/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here