जयगड येथे ५ डिसेंबरला जेएसडब्ल्यू कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धा

0

जेएसडब्ल्यू उद्योग समूह आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने चौथी जिल्हास्तरीय कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धा येत्या ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू उद्योग समूहातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

या स्पर्धेसाठी दीड लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम नोंदणी करणार्याि दोन हजार स्पर्धकांना टीशर्ट देण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

जेएसडब्ल्यू उद्योग समूहातर्फे गेली तीन वर्षे जिल्हास्तरीय कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धा आयोजित केली जात आहे. दहा किलोमीटरची स्पर्धा जयगड येथील कऱ्हाटेश्वर मंदिर ते जेएसडब्ल्यू परिसरातील जय विनायक मंदिर या मार्गावर होणार आहे. इतर सर्व गटांच्या स्पर्धा जय विनायक मंदिर येथून सुरू होणार आहेत. रत्नागिरी शहरातून स्पर्धेकरिता जाणाऱ्या स्पर्धकांसाठी बसची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील. खेळाडूंच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. स्पर्धेत केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होऊ शकतील. खेळाडूंनी सोबत जन्मदाखला आणि आधार कार्ड आणणे बंधनकारक असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

स्पर्धेचे प्रवेश अर्ज रत्नागिरीच्या जिल्हा क्रीडा कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रवेशिका येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. अधिक माहितीसाठी संदीप तावडे यांच्याशी ९४३३४३०७९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला जेएसडब्ल्यूच्या मनुष्यबळ विकास विभागाचे वीरेंद्र चंदावत, नरेंद्र देसाई, अमित भातखंडे, सुरक्षा व्यवस्थापक विनोद परब, सुहास भागवत इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here