‘एव्हर गिव्हन’ जहाजामुळे सुएझ कालव्यातील जलवाहतूक सहा दिवस ठप्प; ठोठावला दंड

0

‘एव्हर गिव्हन’ या जहाजामुळे इजिप्तच्या सुएझ कालव्यातील जलवाहतूक सहा दिवस ठप्प झाली होती. आता या जहाजावर कारवाई करण्यात येणार आहे. या जहाजावर जप्तीची कारवाई होणार असून तब्बल 900 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 6540 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जहाज ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती बर्नहार्ड श्यूल्ट शिप मॅनेजमेंटच्या (बीएसएम) प्रवक्त्यांनी दिली आहे. सुएझ कालव्यातील वाहतूक ठप्प झाल्यामुळे सुएझ कालवा प्राधिकरणाचे कोट्यावधींचे नुकसान झाले होते. बीएसएम ही ‘एमव्ही एव्हर गिव्हन’ जहाजाची टेक्निकल मॅनेजर आहे. बीएसएमचे सीईओ इयान बेवरीज यांनी सुएझ कालवा प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या जहाज जप्तीच्या कारवाईच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. सुएझ कालवा प्राधिकरणाची कारवाई अतिशय चुकीची आहे. आम्ही सुरुवातीपासून चौकशीला सहकार्य करत आहोत. सर्व माहितीदेखील दिली आहे. हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निघाले पाहिजे, जेणेकरून जहाज आणि कर्मचारी सुएझ कालव्याच्या सीमेतून बाहेर निघतील, असे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:17 PM 16-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here