चिपळूण : गेल्या २४ तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने कोकणसह मुंबईमधील जनजीवन पुर्णपणे कोलमडले आहे. वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात दरड कोसळणे नित्याची बाब झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट ते पीरलोटे दरम्यान हॉटेल ओमेगा इन जवळ दरड कोसळून मुंबई गोवा महामार्ग पुन्हा बंद झाला आहे. दुपारी तीनच्या सुमारास दरड कोसळल्याने महामार्ग पुन्हा बंद झाला आहे.
