मंगला एक्स्प्रेसमधून पडून दोन महिलांचा मृत्यू

0

साडवली : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रेल्वे स्थानकानजीकच्या आंबेड खुर्द बोगद्यात मंगला एक्स्प्रेसमधून पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या दोघीही रत्नागिरीहून मंगला एक्स्प्रेसने आपल्या गावी राजस्थानम ध्ये जाण्यासाठी प्रवास करत होत्या. सौ. ममता भजनलाल (वय ४१) आणि रमा भजनलाल (२०) अशी मयत झालेल्या दोघींची नावे आहेत. रेल्वेच्या दिव्यांगांसाठी असलेल्या डब्यात त्या बसल्या होत्या. मात्र, गर्दी असल्याने तोल जाऊन त्या पडल्याने त्यांचा मृत्यू झाला

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 17-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here