सत्य परेशान हो सकता हैं… पराजित नही.; आम्ही तयार आहोत- संजय राऊत

0

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उद्याच्या उद्या बहुमत चाचणी व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर न्यायालयाच्या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाधान व्यक्त करत सत्य परेशान हो सकता हैं….. पराजित नही, असं ट्वीट केलं आहे.

HTML tutorial

30 तास काय??? आम्ही 30 मिनिटांत बहुमत सिद्ध करू शकतो. उद्या दिवसासाठी आम्ही सज्ज आहोत… आम्ही 162 आहोत.. यामध्ये वाढ देखील होऊ शकते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

आज संविधान दिनाच्या दिवशी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. म्हणजेच या देशात लोकशाही अजून जिवंत आहे, अशी कमेंट राऊत यांनी केली आहे.

हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करा. पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथ विधी पूर्ण व्हावा. त्यानंतर तातडीने विधीमंडळाच्या पटलावर बहुमत चाचणी व्हावी. गुप्त मतदानाने होणार नाही, लाईव्ह टेलिकास्ट करा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here