येत्या काही तासात नगराध्यक्ष निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता

0

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची साऱयांना उत्सुकता लागली आहे. येत्या काही तासातच आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेकडून प्रदीप साळवी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत. राज्यात घडलेल्या घडामोडींचा परिणाम या निवडणुकीवर देखील प्रकर्षाने जाणवणार आहे. बीजेपी कडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा केला जाणार असल्याने हि निवडणूक रंगतदार होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी या निवडणुकीसाठी प्रशासनस्तरावरून केलेल्या शहरातील अंतिम मतदार यादी कार्यक्रमात एकूण 58 हजार 770 मतदारांची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा 352 मतदारांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

   नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचे शहरात वारे वाहत आहेत. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक प्रभागातील मताधिक्यांचा आढावा घेत राजकीय पक्षांकडून मतदारांना काबूत ठेवण्यासाठी संपर्क बैठकाही सुरू झाल्या आहेत. प्रशासन स्तरावरूनदेखील या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी घेतलेल्या शहरातील मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

  या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याच्या मुदतीत शहरात एकूण 58 हजार 770 मतदारांची नोंद असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. ही यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये 28 हजार 746 पुरूष तर 30 हजार 23 स्त्राr मतदार आहेत. तर एक इतर मतदार आहे. आगामी निवडणुकीत होणाऱया मतदानासाठी शहरात 49 मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही नगर परिषद प्रशासन सूत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here